मराठा समाजाच्या हिताचा खून ठाकरे सरकारने केला; आशिष शेलारांचा हल्लाबोल

0
200

बीड : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. तसेच ते जळगाव दौऱ्यावर असताना एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानीही गेले. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. फडणवीस काल शरद पवार यांना भेटले, एक दिवस ते मातोश्रीवरही येतील, असं संजय राऊत म्हणाले. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली.

मातोश्रींचं आव्हान आम्ही स्विकारतो, असं आशिष शेलार म्हणाले. आशिष शेलार आज बीड दाैऱ्यावर आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.

महाविकास आघाडी सरकारने आतापर्यंत कुकर्मातील सर्व रेकॉर्ड तोडले आहेत, मराठा समाजाच्या आरक्षणाचा कोल्ड ब्लडेड मर्डर केलेला आहे. याला सर्वस्वी जबाबदार काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे. मराठा समाजाच्या हिताचा खून ठाकरे सरकारने केला आहे, असा हल्लाबोल आशिष शेलारांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

शरद पवारांमुळे मराठा आरक्षण मिळालं नाही, या सरकारला कुणालाच आरक्षण द्यायचं नाही- गोपीचंद पडळकर

“मातोश्रीने आमच्यासाठी दरवाजे बंद केले, आम्ही ‘मातोश्री’वर जाणं बंद केलं नाही”

“आम्ही परीक्षा रद्द केल्या की विरोध, केंद्राने रद्द केल्या तर स्वागत…”

राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांची सहमती; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here