Home महाराष्ट्र राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांची सहमती; म्हणाले…

राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांची सहमती; म्हणाले…

मुंबई : मुंबईसह राज्यातील अन्य महानगरपालिकांच्या निवडणुकीत मनसे पूर्ण ताकदीने उतरणार असून, कोणाबरोबर युती करायची वा नाही याचा निर्णय वेळ येईल तेव्हा घेऊ, तसचं समाज अस्थिर असताना निवडणुका घेणे कितपत योग्य याचाही विचार झाला पाहिजे असं मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ‘लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. त्याला शिवसेना खासदार संजय राऊत सहमती दर्शवली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“माझंही तेच म्हणणं आहे. विरोधी पक्ष उगाच घाई का करत आहे. अशा प्रकारचे निर्णय होत असल्याचं त्यांना कोण सांगत आहे. जर त्यांच्या गुप्तहेरांनी बातमी दिली असेल तर ते चुकीची बातमी देत आहेत. असं काही नाही. काही करायचं असेल तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, निवडणूक आयुक्त सांगतील. तुम्ही लोकांच्या मनात संभ्रम का निर्माण करता?, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या वक्तव्याशी सहमती दर्शवताना संजय राऊत यांनी भाजपा नेते आशिष शेलार यांच्या टीकेलाही अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

एकनाथ खडसे, उदय सामंत शरद पवारांच्या भेटीला; उदय सामंत यांनी दिलं भेटीबाबत स्पष्टीकरण

खासदार उदयनराजे भोसले मराठा आरक्षण आंदोलनात पुढाकार घेण्यास तयार; हर्षवर्धन पाटलांनी दिली माहिती

चंद्रकांतदादांचा तोल ढासळला आहे, त्यांना उपचाराची गरज; संजय राऊतांचा टोला

मोदींना पाहून लोकांनी मतदान केलं, बाळासाहेबांना पाहून शिवसेनेला सत्ता दिली- राज ठाकरे