आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कोल्हापूर : राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी पाच महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईमधील सिल्व्हर ओक या निवास्थानाबाहेर आंदोलन सुरू केलं. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी पवारांच्या निवासस्थानावर चपला देखील फेकल्या. यावरुन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ठाकरे सरकारवरच निशाणा साधला.
शरद पवार यांच्या घरावर हल्ला होणे अत्यंत दुर्दैवी आहे. ही बाब गंभीर आहे. कोणत्याही नेत्याच्या घरावर अशा प्रकारे हल्ला होणे योग्य नाही, असं सांगतानाच शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी झालेल्या हल्ल्याला ठाकरे सरकार जबाबदार आहे. भाजपचा या हल्ल्याशी काही संबंध नाही. या प्रकरणी चौकशी झालीच पाहिजे आणि दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.
हे ही वाचा : आता राज ठाकरे देणार ‘करारा जवाब; ठाण्यातल्या बहुचर्चित सभेचा टीझर मनसेकडून प्रदर्शित
भाजप सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळत होते. आताच्या सरकारमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळत नाही. हे सरकार आल्यापासून एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे योग्य पद्धतीने लक्ष दिले नाही. एसटी महामंडळाचे विलीनीकरण करण्यास हरकत नाही. एसटी ही ग्रामीण भागात देणारी सेवा असून, एसटीला मदत करणे सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे विलीनीकरण व्हावे, ही आमची भूमिका, असंही रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, उत्तर कोल्हापूर मतदारसंघात असलेल्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी रामदास आठवले कोल्हापूरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
महत्वाच्या घडामोडी –
“मोठी बातमी! अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना 2 दिवसांची पोलिस कोठडी”
नितीन गडकरींनंतर आता रावसाहेब दानवे राज ठाकरेंच्या भेटीला; चर्चांना पुन्हा उधाण
शरद पवारांच्या घरावर झालेल्या आंदोलनावरून देवेंद्र फडणवीसांनी मुंबई पोलिसांना सुनावलं ; म्हणाले…