आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
रत्नागिरी : राज्यात ठाकरे सरकार आहे, असं आम्ही म्हणतोय मात्र प्रत्यक्ष लाभ पवार सरकार घेत असल्याचं वक्तव्य शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी केलंय. दापोली तालुक्यात एका कार्यक्रमात बोलत होते.
राज्यात विकास कामांच्या निधीमध्ये पळवापळ केली जात आहे. ग्रामविकास मंत्रालयाच्या योजनांमधून निधी मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळते. आम्हाला मुंबईमध्ये हा प्रश्न उद्भवत नाही. कारण मुंबईत नागरोत्थान आणि नगरविकासचा निधी मिळतो, तसेच मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून आम्ही निधी मिळवितो. परंतु विकास कामांच्या निधीमध्ये पळवापळवी केली जात आहे, असं गजानन किर्तीकर म्हणाले आहेत.
हे ही वाचा : “तिथीप्रमाणं शिवजयंती साजरी करण्यासाठी राज ठाकरेंचा मेगा प्लॅन, शिवतीर्थवर जल्लोषात साजरी होणार शिवजयंती”
दरम्यान, आम्ही म्हणायचं की आमचं ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ मात्र पवार सरकार घेतं, असं गजानन किर्तीकर यांनी म्हटलं आहे. रत्नागिरी जिल्हयातील दापोली तालुक्यातील शिर्दे-वडवली,ब्राम्हणवाडी ते कोळबांद्रे रस्त्याच्या डांबरीकरण भूमिपुजन कार्यक्रमात ते बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट काढला तर तो सुपर डुपर चालेल- करूणा शर्मा
एम आय एम ची आहे हार्डलाईन, त्यामुळे…; मविआ-एमआयएम युतीच्या चर्चांवर रामदास आठवलेंची कविता
राष्ट्रवादीनं MIM चा प्रस्ताव धुडकावला, आमच्यासाठी विषय संपला- शरद पवार