आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. लतादिदींच्या निधनानं देशभरात शोककळा पसरली आहे. लतादिदींच्या निधनामुळं राज्यात देशात 2 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोककळा व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.
लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हे ही वाचा : आदित्यजी, अमृता फडणवीसांवर टीका करण्यापेक्षा तुम्ही…; चित्रा वाघ यांचा टोला
स्वरसम्राज्ञी लतादिदी आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत. अनादि आनंदघन म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील, अशा शोकमग्न भावनांसह मुख्यमंत्र्यांनी लतादिदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 6, 2022
महत्वाच्या घडामोडी –
शिवसैनिकांकडून सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर संजय राऊतांकडून प्रतिक्रिया; म्हणाले…
गानकोकिळेची स्वरयात्रा विसावली; भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन
“दारूच्या नशेत बंडाचा केंव्हा सय्यद बंडा झाला कळलेच नाही”