Home महाराष्ट्र राज्याला प्रशासनही नाही, मुख्यमंत्रीही नाही, राज्य आम्हांला द्या, आम्ही वेटींगवर आहोत- नारायण...

राज्याला प्रशासनही नाही, मुख्यमंत्रीही नाही, राज्य आम्हांला द्या, आम्ही वेटींगवर आहोत- नारायण राणे

चिपळूण : राज्यात गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाने जोरदार तडाखा लावलेला आहे. राज्यातील अनेक भागात पूर आला असून अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. मुसळधार पावसामुळे चिपळूणमध्येही बऱ्याच प्रमाणात नुकसान झालं. यावर भाजप नेते नारायण राणे यांनी चिपळूणवरील परिस्थितीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

राज्यात पूरस्थिती आली आहे. त्यानंतर चार दिवसाने मुख्यमंत्री चिपळूणमध्ये आले. हे कसले मुख्यमंत्री आहेत. मी तर म्हणतो राज्याला प्रशासनही नाही आणि मुख्यमंत्रीही नाही, असं म्हणतच राज्य चालवता येत नसेल तर केंद्राला देऊन टाका. आम्ही वेटिंगवरच आहोत, असा टोला राणेंनी यावेळी लगावला.

तुम्ही मदत मागायच्या आधीच मोदींनी पाठवली आहे. बाकीची मदत आम्ही मिळवून देऊ. कोणी मागायची गरज नाही. केंद्र कोणतीही मदत बाकी ठेवत नाही. केंद्र सर्व मदत देते, असं सांगतानाच केंद्रालाच सारखी सारखी मदत मागायची असेल तर राज्य कशाला आहे., असा हल्लाबोल राणेंनी यावेळी केला.

दरम्यान, नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज चिपळूणच्या बाजारपेठेत जाऊन पाहणी केली. त्यानंतर नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

सांगलीच्या नाका तोंडात पाणी; कृष्णा नदीची पाणी पातळी 55 फुटांवर

काँग्रेस कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना शक्य ती मदत करावी; नाना पटोलेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

“धक्कादायक! वरळीमध्ये इमारत कोसळली, चाैघांचा मृत्यू तर अनेक जखमी”

“कोकणवासीयांची बिस्कीट व मेणबत्त्यावर बोळवण करू नका, यावेळी तर मनापासून मदत करा”