नागपूर : ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अद्याप निकाली निघालेला नाही. अशावेळी राज्य निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. यावरुन भाजप नेते आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय.
राज्य सरकारचे सर्व मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार नाहीत. पण आझ राज्य निवडणूक आयोगानं निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्य सरकारनं ओबीसी समाजाची दिशाभूल केली आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका होणार नाहीत असं राज्य सरकारनं जाहीर केल्यानंतर निवडणुका लावल्या कशा? असा सवालही चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका, तसंच पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
प्रविण दरेकर, महिलांची माफी मागा अन्यथा…; रुपाली चाकणकरांचा इशारा
‘सरकार नावाची व्यवस्था अस्तित्वात आहे का?’; चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल
राष्ट्रवादीवर टीका करताना प्रवीण दरेकरांची जीभ घसरली; म्हणाले…