दुसरा व्हिडिओ बाॅम्ब उद्या-परवा येतोय; चंद्रकांत पाटलांचा सूचक इशारा

0
519

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 8 मार्च रोजी भाजप नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात कट रचला जात असल्याचे सांगत विधानसभा अध्यक्षांना वेगवेगळ्या व्हिडीओ फुटेजने भरलेला पेनड्राईव्ह दिला. फडणवीस यांच्या या व्हिडीओ बॉम्बने चांगलीच खळबळ उडाली आहे. यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

उद्या किंवा परवा आणखी एक व्हिडीओ बॉम्ब येणार असल्याचं चंद्रकांत पाटलांनी यावेळी म्हटलं. तसेच हा व्हिडीओ पहिल्यापेक्षाही स्ट्रँग असल्याचंही चंद्रकांत पाटील म्हणाले. ते टी.व्ही.9 मराठीशी बोलत होते.

हे ही वाचा : फडणवीस पुरून उरतील, ते किती तरी ठाकरे-पवार खिशात घालून फिरतात- निलेश राणे

केंद्रीय तपास यंत्रणांकडून तुम्ही आम्हाला त्रास देता म्हणून आम्ही तुम्हाला त्रास देतो असं सुरु आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडीओ बॉम्ब टाकला. एका व्हिडीओ बॉम्बमुळे सगळं चिडीचूप झालंय. दुसरा व्हिडीओ उद्या-परवा येतोय. दुसरा व्हिडीओ तर खूपच स्ट्रँग आहे. फडणवीस यांच्या पाठीमागे पूर्ण भाजप तसेच जनता आहे, असंही चंद्रकांत पाटलांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

जेलमध्ये गेल्यावर काही लोक…; संदीप देशपांडेचा संजय राऊतांना टोला

“रामदास आठवले यांचाच पक्ष भाजपच्या दावणीला बांधलेला, ते काय शिवसेनेच्या भविष्यावर बोलतील”

पुणे महापालिकेत भाजपच कमळ फुलणार; भाजपच्या ‘या’ नेत्याचा दावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here