Home महाराष्ट्र फडणवीस पुरून उरतील, ते किती तरी ठाकरे-पवार खिशात घालून फिरतात- निलेश राणे

फडणवीस पुरून उरतील, ते किती तरी ठाकरे-पवार खिशात घालून फिरतात- निलेश राणे

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

रत्नागिरी : रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात मोठी माहिती समोर येत आहे. रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावण्यात आली आहे. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी बोलताना महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर अशा केसेस टाकून त्यांना घाबरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, फडणवीस पुरून उरतील. ते किती तरी ठाकरे आणि पवार खिशात घेऊन फिरतात., असा घणाघात निलेश राणेंनी यावेळी केला.

हे ही वाचा : राज ठाकरे यांच्यानंतर संदीप देशपांडेचा राऊतांना टोला; म्हणाले…

अजित पवार हे अर्थ खात्यासाठी योग्य नाहीत. त्यांना अर्थ खाते किती कळते ते माहीत नाही, पण अलोकेशन ऑफ फंड म्हणजे बजेट नव्हे. मी स्वतः फायनान्सचा विद्यार्थी आहे. मला बजेट माहित आहे. अलोकेशन ऑफ फंड म्हणजे इम्प्लिमेट ऑफ फंड नाही. मराठी भवनसाठी प्रत्येक वेळी निधी जाहीर होतो, पण आजवर एकही वीट रचलेली नाही. कोकणातील गडकिल्ल्यांना फक्त निधी जाहीर करतात. प्रत्यक्षात किल्ले ढेपाळत आहेत. वित्तीय तूट कशी झाली, यावर अजित पवार बोलतील का, त्यांना फक्त कारखाने कसे लुटायचे ते माहीत आहे, असा आरोपही निलेश राणेंनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

“रामदास आठवले यांचाच पक्ष भाजपच्या दावणीला बांधलेला, ते काय शिवसेनेच्या भविष्यावर बोलतील”

पुणे महापालिकेत भाजपच कमळ फुलणार; भाजपच्या ‘या’ नेत्याचा दावा

मोठी बातमी! फोन टॅपिंग प्रकरणी नोटीस विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना