Home महाराष्ट्र जवळचा मित्र सोबत नसल्याचं दु:ख कायम मनात राहील; आर आर आबांविषयी बोलताना...

जवळचा मित्र सोबत नसल्याचं दु:ख कायम मनात राहील; आर आर आबांविषयी बोलताना अजित पवार भावूक

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री व दिवंगत नेते आर आर पाटील यांची जयंती. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

महाराष्ट्राच्या राजकारणातला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला माझा सहकारी, जवळचा मित्र आज आपल्यासोबत नाही, याची खंत व दु:ख कायम मनात राहणार आहे , असं म्हणत अजित पवारांनी आबांना आदरांजली वाहिली.

ग्रामीण विकासाची आस, तंटामुक्त समाजाचा ध्यास घेऊन आबांनी राबवलेलं प्रत्येक अभियान लोकचळवळ बनलं. पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त भरती प्रक्रियेच्या आबांच्या निर्णयाने हजारो गरीब युवकांना पोलिस दलाची दारं खुली करुन दिली. डान्सबार बंदी, गुटखाबंदीच्या त्यांच्या निर्णयाने महाराष्ट्राच्या कित्येक पिढ्या वाचवल्या. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्याचं काम आर. आर. आबांनी यशस्वीपणे केले, अशा शब्दात अजित पवारांनी आबांचं अभिवादन केलं.

महत्वाच्या घडामोडी –

पत्र गेलेलं आहे, वाढत्या वयामुळं त्यांच्या लक्षात आलं नसेल; शरद पवारांचा राज्यपालांना टोला

“फाळणीच्या स्मृती जाग्या ठेवायच्या की, स्मृतींना तिलांजली देऊन वेदना देणाऱ्यांवर प्रहार करायचा”

काँग्रेसला मोठा धक्का! काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी”

लायकीत रहायचं नाहीतर पुण्यात फिरणं अवघड करू; मनसेचा संभाजी ब्रिगेडला इशारा