Home महाराष्ट्र पूरग्रस्तांसाठी जाहीर पॅकेज मध्ये शेतकऱ्यांसाठी मदत दिसत नाही- देवेंद्र फडणवीस

पूरग्रस्तांसाठी जाहीर पॅकेज मध्ये शेतकऱ्यांसाठी मदत दिसत नाही- देवेंद्र फडणवीस

मुंबई : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांना पावसाचा जोरदार तडाखा बसला. या भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जीवित तसेच, वित्तहानी देखील झाली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तब्बल 11 हजार 500 कोटींच्या पॅकेजला मंजुरी दिली आहे, यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘कोल्हापूर, सांगली,सातारा आणि कोकणासह राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने 11 हजार 500 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. परंतु, ही मदत केवळ 1500 कोटी रूपयांचीच तातडीची मदत दिसून येत असून प्रथमदर्शनी तरी शेतकर्‍यांसारख्या महत्त्वाच्या घटकाला कुठलीही मदत केलेली दिसत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

या मदतीत पुनर्बांधणीचे 3000 कोटी आणि सौम्यीकरण उपाययोजनांचे 7000 कोटी असे 10 हजार कोटी रुपये हे दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये मोडतात. त्यामुळे प्रत्यक्ष मदत ही 1500 कोटी रुपयांचीच दिसते. पॅकेजमध्ये शेतीपिकांचे नुकसान, अन्नधान्य पुरवठा, स्वच्छता अनुदान, घरांसाठी वाळू-मुरूमची उपलब्धता अशा 2019 मध्ये देण्यात आलेल्या अनेक मदतींचा उल्लेख नाही. या मदतीबाबतचा विस्तृत शासन आदेश जारी झाल्यानंतरच याबाबतची स्पष्टता आल्यानंतरच सविस्तर प्रतिक्रिया देता येईल, असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार यात शंका नाही”

सामान्य मुंबईकरांना छळण्यात ठाकरे सरकारला कसा विकृत आनंद मिळतो हे दिसलं- केशव उपाध्ये

नवाब मलिकांनी राज्यापालांच्या दाैऱ्यावर बोलण्यापेक्षा…; प्रवीण दरेकरांचा नवाब मलिकांना सल्ला

खावाले काळ, नी भूईले भार म्हणजे ठाकरे सरकार’; आशिष शेलारांचा घणाघात