मुंबई : राममंदिर कार्य हे राष्ट्रीय अस्मितेचे कार्य आहे. या कार्याची कोणी जाणीवपूर्वक बदनामी करत असेल तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. अयोध्येतील राममंदिर हे रामभक्तांचा त्याग, संघर्ष व बलिदानातून उभे राहिले. हाच इतिहास आहे. एखाद्या घोटाळ्याचा डाग त्या मंदिरावर पडत असेल तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल, असं म्हणत शिवसेनेने मुखपत्र असलेल्या सामनातून अयोध्येतील राम मंदिर निर्मितीबाबत अनेक सवाल उपस्थित केले आहेत. यावरुन विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.
हिंदुत्व विसरले, राम मंदिराच्या कार्यावर सामनातून प्रश्न उपस्थित केले! भूमिपुत्रांना हक्क देण्याचा पडला विसर, हप्ताखोरी अन खंडणी गोळा करण्यात सोडली नाही कसर, असं म्हणत प्रवीण दरेकरांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
दरम्यान, बाळासाहेबांना दिलेल्या वचनाचे कारण सांगून, महाराष्ट्राला एका वर्षात बकाल दाखवले करून! एवढे अनर्थ एका सत्तेसाठी झाले, असंही प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.
हिंदुत्व विसरले,
राम मंदिराच्या कार्यावर सामनातून प्रश्न उपस्थित केले!
भूमिपुत्रांना हक्क देण्याचा पडला विसर,
हप्ताखोरी अन खंडणी गोळा करण्यात सोडली नाही कसर!
बाळासाहेबांना दिलेल्या वचनाचे कारण सांगून,
महाराष्ट्राला एका वर्षात बकाल दाखवले करून!
एवढे अनर्थ एका सत्तेसाठी झाले!— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) June 16, 2021
महत्वाच्या घडामोडी –
बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कुठे आणि आज महिलांवर हात उगारणारी शिवसेना कुठे?- केशव उपाध्ये
शिवसेनेनं आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली; शिवसेना भवनासमोरील राड्यावरून आशिष शेलारांचा हल्लाबोल
“शिवसेना भवनासमोर राडा, शिवसैनिकांकडून मारहाण झाल्याचा भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांचा आरोप”
मराठा आरक्षणासाठी लोकसभेचं अधिवेशन झालंच पाहिजे- खासदार धैर्यशील माने