मुंबई : ही अनैसर्गिक युतीची सत्ता आहे. ती जास्त काळ टीकत नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
आम्ही सरकारकडे लक्षच देत नाही. कारण महाविकासआघाडी सरकारमध्ये अनेक आंतरविरोध आहेत. हे सरकार आंतरविरोधाने भरलं आहे. कुणाचाच पायपोस कुणाच्या पायात नाही. त्यामुळे हे सरकार जितके दिवस चालायचं तितके दिवस चालेल. एक दिवस जाईल. त्यामुळे ते काय म्हणतात हे काय म्हणतात हे महत्त्वाचं नाही. ही अनैसर्गिक युती आहे. अशी अनैसर्गिक युती देशाच्या राजकारणात फारशी कधी टिकली नाही, असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, नुकतीच विधीमंडळ अधिवेशनाची तारीख ठरली आहे. त्या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केल्याचे पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या घडामोडी-
सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करा; रामदास आठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
राज्यातंर्गत प्रवासावरील निर्बंध हटवा; भाजपची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
लॉकडाऊन हवं की नको? मनसेनं केला सर्वेक्षणाचा कौल जाहीर
सचिन तेंडुलकरचा ‘हा’ रेकॉर्ड फक्त विराट कोहलीच मोडू शकतो- इरफान पठाण