Home पुणे महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारणं म्हणजे द्वेषाचं राजकारण- अमोल कोल्हे

महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारणं म्हणजे द्वेषाचं राजकारण- अमोल कोल्हे

पुणे : प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर होणाऱ्या संचलनासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारण्यात आला आहे. यावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाष्य केलं आहे.

महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारणं म्हणजे द्वेषाचं राजकारण आहे. अशा प्रकारचा निर्णय घेऊन भाजप द्वेषाचे राजकारण करत आहे. असं म्हणत अमेल कोल्हे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ते आळंदी येथे पत्रकारांशी बोलत होते.

आपल्या राज्याचा चित्ररथ हा प्रजासत्ताक दिनी राजपथावरुन जाणं ही अभिमानाची गोष्ट असायची. मात्र, तो का नाकारण्यात येत आहे?, याविषयी खरोखर संभ्रम आहे. यामध्ये द्वेषाचं राजकारण तर नाही ना? असा सवाल अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला.

दरम्यान, महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारल्यानं शंकेला जागा आहे. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांचे चित्ररथ नाकारण्यात आले आहेत. महाराष्ट्राचा चित्ररथ लहानपणापासून आम्ही बघत आलो आहोत, असंही कोल्हे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

शिवसेनेने अपयशी लोकांना सोबत घेऊन जनादेशाचा अनादर केला- देवेंद्र फडणवीस

सावरकरांबाबत काँग्रेस सेवादलाचं वादग्रस्त पुस्तक; संजय राऊत आक्रमक

-सचिन सावंत यांनी केली ‘टिकटॉक’ स्टाईलने फडणवीसांवर टीका

-देवेंद्र फडणवीस यांची मन:स्थिती मी समजू शकतो- जयंत पाटील