आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर 4-5 दिवसांपूर्वी मुंबईतील शिवाजी पार्क येथे हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर तातडीने त्यांना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तसेच काही वेळाने लगेजच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. या सगळ्या प्रकरणावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : “महाबजेट 2023! राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस, देवेंद्र फडणवीसांनी केल्या, ‘या’ महत्त्वाच्या घोषणा”
आत्मचरित्राची चार पानं वाढली, त्यादिवशी घटना घडली त्यावर मी काही बोललो नाही. कुणी केलं असेल, असं लोक विचारत आहेत. एक निश्चित सांगतो, त्याला आधी कळेल त्याने हे केलं आहे. मग सगळ्यांना कळेल, हे त्यांनी केलं आहे. माझ्या मुलाचं असं रक्त वाया घालू देणार नाही. महाराष्ट्रासाठी काम करण्यासाठी आलोय, या फडतूस लोकांसाठी नाही,’ अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी यावेळी दिली. आज मनसेचा 17 वा वर्धापन दिन ठाण्यात पार पडला. यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, 22 तारखेला गुढी पाडव्यानिमित्त मनसेची सभा होणार आहे, या सभेमध्ये मशिदींवरच्या भोंग्याबाबत बोलणार आहे, असं विधान राज ठाकरे यांनी यावेळी केलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
” ‘या’ ठिकाणी राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा, शरद पवार म्हणाले, आमचा पाठिंबा भाजपला नाही, तर…”
भावी पंतप्रधानांना शुभेच्छा, भंकस वाटली असेल तर…; मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला