Home महाराष्ट्र ” ‘या’ ठिकाणी राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा, शरद पवार म्हणाले, आमचा पाठिंबा भाजपला...

” ‘या’ ठिकाणी राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा, शरद पवार म्हणाले, आमचा पाठिंबा भाजपला नाही, तर…”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : नागालँड विधानसभा निवडणुकीत भाजप-एनडीपीपी युतीला बहुमत मिळालं आहे. एकूण 60 जागांसाठी झालेल्या निवडणूकीत 37 जागांवर भाजप-एनडीपीपी युतीचा विजय झाला आहे.

या 37 पैकी एनडीपीपीला 25 जागा, तर भाजपला 13 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे नागालँडमध्ये एनडीपीपी-भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं असून राष्ट्रवादी काँग्रेसनं एनडीपीपी-भाजपला स्पष्ट बहुमत असतानाही त्यांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : भावी पंतप्रधानांना शुभेच्छा, भंकस वाटली असेल तर…; मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला

नागालँडमधील चित्र बघितल्यानंतर तेथे एकप्रकारे राजकीय स्थैर्य येण्यासाठी आमची मदत मुख्यमंत्र्यांना होत असेत, तर आमचा पाठिंबा आहे. मात्र, भाजपला आमचा पाठिंबा नाही., असं शरद पवारांनी यावेळी स्पष्ट सांगितलं.

दरम्यान, मेघालय आणि शेजारील राज्यात निवडणुका पार पडल्या. तिथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह दोघेही गेले होते. पंतप्रधानांनी मेघालयाच्या प्रचारात मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावत पराभव करण्याचं आवाहन केलं होतं, असं पवार म्हणाले. तसेच निवडणुकींचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांच्यासोबत सहभागी झाले आणि मंत्रिमंडळात त्यांच्या सदस्यांचा सहभागही आहे, ही आमची भूमिका नाही,’ असं म्हणत पवारांनी भाजपवर टीका केली.

महत्त्वाच्या घडामोडी –

मनसे नेते वसंत मोरेंच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी, वसंत मोरेंकडून संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले…

“महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट?; होळीच्या दिवशीच फडणवीसांची, ठाकरेंना साद, पुन्हा एकत्र येणार?”

अशोक चव्हाणांच्या गळ्यात भगवा शेला, चर्चांवर आता चव्हाणांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…