खोटा हिंदुत्वाचा बुरखा घातलेला पक्ष आपल्यासोबत होता, त्यामुळे…; उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

0
420

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आजच्या सभेत भाजपवर जोरदार निशाणा साधलाय.

अडीच वर्षांपूर्वी आम्ही तुम्हाला सोडलं. आमचे काही जुने फोटो तुमच्याबरोबरचे येत आहेत, त्यामुळे तुमचा गैरसमज झाला असेल की आमचे हिंदुत्व गधाधारी आहे. त्या गध्याला आम्ही सोडून दिलं आहे. कारण उपयोग नाही त्याचा. शेवटी गाढव ते गाढव. त्यामुळे घोड्याच्या आवेशात आमच्यासोबत जी गाढवं होती त्या गाढवांनी लाथ मारायच्या आधी आम्ही त्यांना लाथ मारुन बाहेर पडलो आहोत, अशी टीका  उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

हे ही वाचा :  कोण आहे नवनीत राणा?, त्या…; विद्या चव्हाण यांची जीभ घसरली

खोटा हिंदुत्वाचा बुरखा घातलेला पक्ष आपल्यासोबत होता. ते देशाची दिशा भरकटवत आहेत. मला आज मोठी गदा दिली. याआधी मी बोललो होतो की आमचं हिंदुत्व कसं आहे हे आम्हाला शिवसेना प्रमुखांनी शिकवलं. ते म्हणाले होते मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको तर तो अतिरेक्यांना बडवणारा हिंदू हवा आहे. हाच धागा घेऊन आपण पुढे जात आहोत,असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, आमच्या सामनामध्ये जे येतं ते राज्याच्या आणि देशाच्या हिताचं असतं. संजय राऊत यांचा एक लेख काढून दाखवा ज्यात आम्ही नरेंद्र मोदींचा अपमान केला असेल, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणं पडलं महागात, अभिनेत्री केतकी चितळेला पोलिसांकडून अटक”

औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेणाऱ्या अकबरुद्दीन ओवेसींना संजय राऊतांचं जोरदार उत्तर, म्हणाले…

रायगडमध्ये शिवसेनाला मोठा धक्का; शिवसेनेच्या ‘या’ आमदाराला दोन वर्षांची शिक्षा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here