“राहुल गांधी ज्यांच्या खांद्यावर हात ठेवतात तो पक्ष रसातळाला जातो”

0
254

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या खांद्यावर हात ठेवल्याचा फोटो तीन दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. यावरुन केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

काँग्रेस आता कुठे आहे का? ती संपत चालली आहे. राहुल गांधींना आता कुणाचा तरी आधार पाहिजे. जेव्हा जेव्हा राहुल गांधी कुणाच्या खांद्यावर हात ठेवतात, तेव्हा तेव्हा तो पक्ष रसातळाला जातो हा इतिहास आहे, असं नारायण राणे म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी काहीच काम केलं नाही. त्यामुळे ‘सामना’कडे छापण्यासारखं काहीच नाही. त्यामुळे ते भाजपबद्दलच्या बातम्या देत असतात, असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“…तर सत्ताधारी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार”

महाराष्ट्रातील भाजप खासदारांची दिल्लीत गुप्तबैठक; दानवेंच्या घरी होणारखलबतं, राजकीय चर्चांना उधाण

“हिंदूमध्ये भितीचं वातावरण निर्माण करण्याचं काम ठाकरे सरकारच्या माध्यमातून सुरू आहे”

राहुल गांधी यांच्या विरोधात ट्विटरची मोठी कारवाई; अकाऊंट सस्पेंड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here