Home देश राहुल गांधी यांच्या विरोधात ट्विटरची मोठी कारवाई; अकाऊंट सस्पेंड

राहुल गांधी यांच्या विरोधात ट्विटरची मोठी कारवाई; अकाऊंट सस्पेंड

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात ट्विटरकडून शनिवारी कारवाई करण्यात आली. राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. यानंतर त्यांनी याबाबतचा फोटो आपल्या ट्विटर खात्यावर पोस्ट केला होता.

राहुल गांधीच्या ट्वीटर पोस्टवर भाजपकडूनही आक्षेप घेण्यात आला होता. तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने ट्विटर इंडियाला नोटीस पाठत बलात्कार पीडितेची ओळख जाहीर करणारे ट्विट हटवण्याची मागणी केली होती. “त्यानंतर ट्विटरनं राहुल गांधी यांचं ते ट्वीट हटवलं होतं. मात्र, आता त्यांचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट तात्पुरतं बंद करण्यात आलं असून ते पुन्हा सुरळीत करण्यासाठी प्रक्रिया सुरु आहे,” अशी माहिती काँग्रेसकडून ट्वीट करत देण्यात आली.

महत्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आज सांगोला दौऱ्यावर

“उसी पानीपत के छोरे ने आज इतिहास को मोड़ा है”

मोठी बातमी! एकनाथ खडसेंवर आठवडाभरापासून रुग्णालयात उपाचार सुरू

उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय! नारायण राणेंच्या मित्राला राज्य मंत्रीपदाचा दर्जा