मुंबई : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातल्या गडचिंचले येथे जमावाकडून तीन साधूंची जमावानं हत्या केली होती. या घटनेनंतर राज्यात व देशातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या घटनेचा तपास राज्य सरकारनं सीआयडीकडे दिला होता. सीआयडीनं या प्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं असून, घटनेमागील कारणाचा उलगडाही झाला आहे. याविषयी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
“तीन महिन्यांपूर्वी पालघरला झालेल्या हल्ल्यात 2 साधू आणि 1 ड्रायव्हर अशा तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. याप्रकरणाचा सर्व तपास सीआयडीकडे देण्यात आला होता. त्यानुसार त्यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. सदर घटना फक्त अफवेतून घडली असल्याचे सीआयडीच्या तपासातून निष्पन्न झालं आहे.
दरम्यान, अनेक राजकीय पक्षांनी या घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला होता. पण सीआयडीच्या तपासातून ही घटना केवळ अफवेतून घडली असल्याचं स्पष्ट झालं आहे. सीआयडीनं या प्रकरणात 808 लोकांची सखोल चौकशी करून 154 जणांना अटक केली आहे. तसेच पुढील कार्यवाही न्यायालयात चालेलं,” असं अनिल देशमुख म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
मुंबईतील फोर्ट परिसरात इमारत कोसळून दुर्घटना
महाजॉब्स जाहिरात वादावर बाळासाहेब थोरातांची रोखठोक भूमिका
मी पुन्हा येईन ही घमेंड नाही तर…; नारायण राणेंचा शरद पवारांवर निशाणा
सामनातून उद्धव ठाकरेंवर टीका करण्यासाठी शरद पवारांची मुलाखत घेतली- नारायण राणे