Home महाराष्ट्र मुंबईतील फोर्ट परिसरात इमारत कोसळून दुर्घटना

मुंबईतील फोर्ट परिसरात इमारत कोसळून दुर्घटना

मुंबई : मुंबईतील फोर्ट परिसरात इमारत कोसळून दुर्घटना घडली. मुंबईत गेल्या तीन दिवसापासून तुफान पाऊस सुरु आहे. त्यामुळे धोकादायक असलेल्या या भानुशाली इमारतीचा 40 टक्के भाग संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास कोसळला.

या दुर्घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी तातडीने मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चार लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे. मात्र  या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जवळपास 20 जण अडकल्याची भीती आहे.

दरम्यान, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न सुरू केले आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

महाजॉब्स जाहिरात वादावर बाळासाहेब थोरातांची रोखठोक भूमिका

मी पुन्हा येईन ही घमेंड नाही तर…; नारायण राणेंचा शरद पवारांवर निशाणा

सामनातून उद्धव ठाकरेंवर टीका करण्यासाठी शरद पवारांची मुलाखत घेतली- नारायण राणे

“महाजॉब्स योजना महाविकास आघाडी सरकारची की, शिवसेना-राष्ट्रवीदीची?”; ‘या’ काँग्रेस नेत्याचा सवाल