Home महाराष्ट्र राज्यामध्ये आता राष्ट्रपती राजवट हा एकच मार्ग- नितेश राणे

राज्यामध्ये आता राष्ट्रपती राजवट हा एकच मार्ग- नितेश राणे

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करत थेट कानाखाली खेचण्याची भाषा केली होती. यानंतर वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचे कार्यकर्ते नारायण राणे यांच्या जुहूतील निवासस्थानी जमले होते. यावेळी वरुण सरदेसाई यांनी आक्रमक शैलीत राणे कुटुंबीयांना आव्हान केलं.

यानंतर वरुण सरदेसाईंच्या नेतृत्त्वात युवा सेनेच्या मुंबई कार्यकारिणीने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची ‘वर्षा’ येथे भेट घेतली. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना स्टाईलने आंदोलन करणाऱ्या युवासेना पदाधिकारी आणि युवासैनिकांची पाठ थोपटून कौतुक केलं. यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली.

‘या ठगांपासून वाचण्यासाठी राष्ट्रपती राजवट हाच एकच मार्ग आहे’, असं नितेश राणे यांनी म्हटलंय. तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांचा एक फोटो देखील ट्विट केलाय. या फोटोत युवासेनेच्या मुंबई कार्यकारिणानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.

पश्चिम बंगालप्रमाणे ही राज्य पुरस्कृत हिंसा होती. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी राज्याची सुरक्षितता सुनिश्चित केली पाहिजे, पण ते तर गुंडांचा सत्कार करताना दिसत आहेत. ही महाराष्ट्राची स्थिती आहे, असा घणाघात नितेश राणेंनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

“जामीन मिळताच नारायण राणेंना दुसरा धक्का, पुन्हा अटक होणार?”

“राणेंच्या बंगल्यावर जाऊन ताकद दाखविणाऱ्या युवासैनिकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून शाबासकी”

राणेंच्या अटकेनंतर भाजप आक्रमक, उद्या संपूर्ण राज्यात आंदोलन करण्यात येणार; चंद्रकांत पाटलांचा इशारा

नारायण राणेंच्या अटकेसाठी मंत्री अनिल परबांचा पोलिसांना आदेश; व्हिडीओ होतोय व्हायरल?