आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी केलेली चूक मतदारांनी दुरुस्त करत मला विधानसभेत पाठवले. असं सांगतानाच येत्या महापालिका निवडणुकीत माझ्या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे कमीत कमी 16 नगरसेवक विजयी करण्याचा माझा पुरजोर प्रयत्न राहणार आहे, असा विश्वास पुण्यातील वडगाव शेरीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांनी व्यक्त केला.
हे ही वाचा : माणूस एकदम भला आहे, मात्र प्रॉब्लेम एकच कधीच खरं बोलत नाही; भातखळकराचा संजय राऊतांना टोला
वडगाव शेरी हा मतदारसंघ मुळात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. पक्षाला मानणारा मोठा वर्ग पूर्वीपासून या मतदारसंघात आहे. पाच वर्षांत चांगले काम उभे करण्याची तयारी मी सुरू केली आहे. पुढची निवडणूक कुणाच्या विरोधात लढणार हे माझ्यासाठी महत्त्वाचे नाही. त्यापेक्षा माझ्या कामावर मी पुढच्या निवडणुकीत मतदारांसमोर जाणार आहे, असं सुनील टिंगरे म्हणाले आहेत.
दरम्यान, 100 खाटांचे सुसज्ज रुग्णालय व औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय) हे दोन प्रकल्प माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. हे दोन्ही प्रकल्प पूर्ण करण्यास माझे प्राधान्य राहणार आहे, असंही सुनील टिंगरे यांनी म्हटलंय.
महत्वाच्या घडामोडी –
देगलूरमध्ये काँग्रेसचा विजय; अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया, म्हणाले…
“उद्धव ठाकरे पंतप्रधान होणारच! शिवसेनेची दिल्लीकडे वाटचाल सुरु”
“दादरा नगर हवेलीवर शिवसेनेचा भगवा फडकला; कलाबेन डेलकर यांचा 50 हजार मतांनी विजय”