पुण्यात पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच; सुप्रिया सुळेंनी फुंकले महापालिका निवडणुकीचे रणशिंग

0
476

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपासह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि मनसे कामाला लागले आहे. अशातच आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा नोकरी मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पुढचा महापौर हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच असणार, अशी घोषणा केली आहे.

हे ही वाचा : “शिवसेना यंदा साजरी करणार भगवी दिवाळी; औरंगाबादमध्ये 50 हजार घरांवर फडकवणार भगवा”

पुण्यातील लोक भाजपाला थकले आहेत. मतदान करूनही महापौरांकडून चांगले काम झाले नाही. मात्र, येणाऱ्या निवडणुकीत महापौर राष्ट्रवादीचाच होईल, असे लोक सांगतात. अजित पवार यांच्या नेतृत्वात काम करून घ्या आणि निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश सुळे यांनी कार्यकर्त्यांना दिला.

दरम्यान, अजितदादांच्या नेतृत्वात निवडणूक जिंकू. यासाठी निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेशही  सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांना यावेली दिले आहेत.

महत्वाच्या घडामोडी – 

 चंद्रकांत पाटील म्हणाले ‘असे नेते आमच्या खिशात’; आता नवाब मलिक म्हणतात…

मनसेचा राजू शेट्टींना धक्का; स्वाभिमानीच्या तालुकाध्यक्षासह अनेक कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

भाजप नेत्यांचे खिसे एवढे मोठे नाहीत की ते…; धनंजय मुंडेंचा पलटवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here