मुंबई : उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा दिली होती. यानंतर व्यंकय्या नायडू यांनी नाराजी व्यक्त करत अशा घोषणा देऊ नये अशी समज दिली. याच पार्श्वभूमीवर आता एक मोठी घोषणा करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अयोध्या राम मंदिर भूमिपूजनासंबंधी केलेल्या वक्तव्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाकडून मोहीम राबवली जात असून ‘जय श्रीराम’ लिहिलेली 10 लाख पत्रं पाठवली जाणार आहेत. भाजपाच्या याच मोहिमेला राष्ट्रवादी काँग्रेस व्यंकय्या नायडूंना 20 लाख पत्र पाठवून उत्तर देणार आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना 20 लाख पत्रं पाठवण्यात येणार आहेत. या सर्व पत्रांवर ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा लिहिलेली असणार आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“शिवछत्रपती शिवरायांचा आशीर्वाद आणि त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आजपर्यंत जनतेची सेवा करत आलोय”
‘राजगृह’वर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक
“…मग पंतप्रधानांचा 5 ऑगस्टचा कार्यक्रमही प्रतिकात्मक करा”
शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदींची मराठीतून शपथ; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याकडून कौतुक