आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असून काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं. यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला दिलेला कौल हा कर्नाटक आणि देशाच्या राजकारणाची वाटचाल पुन्हा एकदा विकास आणि लोकशाही मजबूत करण्याच्या दिशेनं सुरु झाल्याची नांदी आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.
ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! पराभवानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी दिला राजीनामा”
कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयानं भाजपची दक्षिणेकडील पुरती नाकाबंदी केली आहे, असा घणाघातही अजित पवार यांनी यावेळी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मित्रपक्षांची महाविकास आघाडी महाराष्ट्रातही याची पुनरावृत्ती करेल. महाराष्ट्रातील जनतेनं तसा निर्धार आधीच केला आहे. कर्नाटकातील मतदार, काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन!#KarnatakaElectionResults2023
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) May 13, 2023
महत्त्वाच्या घडामोडी –
कर्नाटकात भाजपचं गणित कुठं चुकलं? देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कारण, म्हणाले…
“सांगलीतील दंडोबा डोंगराच्या पूर्व भागात जोरदार पाऊस, लिंबूंच्या आकाराच्या गारा कोसळल्या”
कर्नाटकात भाजपाचा दारूण पराभव; अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…