पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके यांचं शुक्रवारी मध्यरात्री उपचारादरम्यान निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर आज पंढरपुरातील सरकोली येथे अंत्यसंस्कार केले जातील. भारत भालके यांच्या निधनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त केला आहे.
भारत भालके निधनाची बातमी अत्यंत क्लेशदायक असून सामान्य जनतेशी घट्ट नाळ असलेला, मतदारसंघाच्या विकासासाठी तळमळीने झटणारा लोकनेता आज हरपला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने चांगला लोकप्रतिनिधी, मी निकटचा सहकारी गमावला आहे., असं म्हणत अजित पवारांनी भालकेंना श्रद्धांजली वाहिली आहे.
दरम्यान, पंढरपूर-मंगळवेढ्यातल्या दुष्काळी भागाला पाणी मिळवून देण्यासह भागाच्या विकासासाठी त्यांनी तळमळीने काम केलं. सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठीही त्यांनी सातत्याने आवाज उठवला. जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठीही त्यांचा प्रयत्न असायचा., असं म्हणत अजित पवारांनी आपला शोक व्यक्त केला.
महत्वाच्या घडामोडी-
“भाजपला मराठवाड्याच्या मातीत असं गाडा की, पुन्हा ते निवडणूकच विसरले पाहिजेत”
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं उपचारादरम्यान निधन
राज्यात 31 डिसेंबरपर्यंत लाॅकडाऊन वाढवला; ठाकरे सरकारचा निर्णय