नाव राष्ट्रवादी, पण काम मात्र कुटुंबवादी; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा हल्लाबोल

0
293

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे आणि शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

हे ही वाचा : उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या मुलाला मंत्री केलं, आमच्या गरिबांच्या लेकरांचं काय?; भाजप नेत्याचा सवाल

विधान परिषदेची जागा कुणबी समाजासाठी सोडण्यात यावी, अशी मागणी भास्कर जाधव यांनी केल्यानंतर सुनील तटकरे आणि जाधव यांच्यातील मतभेद पुन्हा वाढले आहेत. कुणबी समाजाला एक जागा सोडा म्हटल्यानंतर सुनील तटकरेंना मिरच्या का झोंबल्या? असा सवाल भास्कर जाधव यांनी यावेळी उपस्थित केला.

नाव राष्ट्रवादी, पण काम मात्र कुटुंबवादी आहे. सुनील तटकरे यांच्यावर खोट्या कंपन्या स्थापन केल्याच्या नावाखाली लोकांच्या हजारो एकर जमिनी लाटल्याचे आरोप आहे. 10 ते 15 हजार कोटींची बेहिशेबी माया गोळा केल्याचेही आरोप तटकरे यांच्यावर आहेत. त्यामुळे अशा माणसाला मार्गदर्शन करण्याची मला गरज नाही. मार्गदर्शन करण्यासाठी समोरच्याकडे जाण, जाणीव आणि नीतिमत्ता असावी लागते आणि सुनील तटकरे यांच्याकडे यातले काहीही नाही, असा हल्लाबोल तटकरे यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

ममता बॅनर्जींनी दिला ‘जय मराठा, जय बांग्ला’ चा नारा; केली उद्धव ठाकरे लवकर बरे होण्याची देवाकडे प्रार्थना

 भाजपा-शिवसेना यांच्यात पुन्हा मैत्री होणार का?; देवेंद्र फडणवीस म्हणतात…

मनसेत जोरदार इनकमिंग; बीडमध्ये अनेक युवकांच्या हाती मनसेचा झेंडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here