नाव परमविरासारखं अन् संपत्ती हडपतो बकासुरासारखी- रूपाली चाकणकर

0
179

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी काही दिवसांपुर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ‘लेटर बाॅम्ब’ फोडून भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. त्यानंतर भाजपने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते देशमुखांच्या बचावासाठी आक्रमक झाले. आता यावर राष्ट्रवादीच्य महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया देत परमबीर सिंग यांच्यावर निशाणा साधला आहे.

नोकरीसाठी महाराष्ट्रात यायचं, राज्याची नोकरी करतानाच विरोधी पक्षाची चाकरी करायची, अमाप संपत्ती कमवायची आणि शेवटी जाताना महाराष्ट्रालाच बदनाम करून जायचं. अस कसं चालेल? असं म्हणत रुपाली चाकणकर यांनी परमबीर सिंह यांच्यावर निशाणा साधला आहे.

#ParambirExposed या हॅशटॅगखाली केलेल्या ट्वीटमध्ये रुपाली चाकणकरांनी परमबीर सिंह यांच्या संपत्तीचा लेखाजोगा मांडला आहे. अंधेरीतील वसुंधरा सोसायटीत 2003 साली परमबीरांनी 48.75 लाख रुपयांचा एक फ्लॅट घेतला तर 2007 साली नेरळमधील शगुफा सोसायटीत 3.60 कोटी रुपये किंमत असलेला एक फ्लॅट घेतल्याचा आरोपही रुपाली चाकणकरांनी केलाय. तसेच परमबीर सिंहांनी 2019 मध्ये हरियाणामध्ये 14 लाख रुपयांची जमीन खरेदी केली असून त्यांच्या हरियाणातल्या घराची किंमत चार कोटी रुपये असल्याची माहितीही रुपाली चाकणकरांनी दिलीय.

महत्वाच्या घडामोडी –

पोलिस दलाला जनतेच्या मनातून उतरवणाऱ्यांची गय केली जाणार नाही; अजित पवारांचा इशारा

मनसे आमदार राजू पाटील करोना पॉझिटिव्ह

अहो उद्धवजी, राज्यात तुमचे दीड वर्षातील पराक्रम पाहता…; चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला

संजय राऊत शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे प्रवक्ते?; प्रवीण दरेकरांचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here