Home महाराष्ट्र वेश्या व्यवसायातील महिलांसाठी महाविकास आघाडी सरकारने केली ‘ही’ मोठी घोषणा

वेश्या व्यवसायातील महिलांसाठी महाविकास आघाडी सरकारने केली ‘ही’ मोठी घोषणा

मुंबई : कोरोनामुळे वेश्या व्यवसायातील महिलांना सर्वाधिक नुकसान सहन करावं लागलं आहे. त्यामुळे या व्यवसायातील महिलांसाठी महाविकास आघाडी सरकारने एक मोठी घोषणा केली आहे.

वेश्या व्यवसायात कार्यरत ओळख निश्चित केलेल्या महिलांना दरमहा 5 हजार रुपये आणि ज्या महिलांची मुले शाळेत जातात अशा महिलांना अतिरिक्त 2 हजार 500 रुपये अर्थसहाय्य कोणत्याही ओळखपत्राचा आग्रह न धरता वितरीत करण्यात येणार आहे., अशी घोषणा महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

याअंतर्गत ऑक्टोबर ते डिसेंबर, 2020 या 3 महिन्याच्या कालावधीसाठी 51 कोटी 18 लाख 97 हजार 500 रुपये इतका निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून उपलब्ध करुन देण्याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला., असंही यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

ईडीचा गैरवापर करून दबाव आणाल तर याद राखा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा

विराट कोहली वनडे क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ठ खेळाडू; ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचकडून काैतुक

शरद पवारांची वृत्ती पाठीत खंजीर खुपसण्याची- अतुल भातखळकर

“ठाकरे सरकार मनसेला घाबरतं, भाजपच्या मोर्चाला परवानगी मग आम्हाला का नाही?”