सिंधुदुर्ग : ओबीसी आरक्षणावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया देत राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
महाविकास आघाडी सरकार हे आता शिवशाही सरकार राहिले नसून बेबंदशाही सरकार झालेले आहे, असा आरोप आशिष शेलार यांनी केला. आशिष शेलार सिंधुदुर्ग दाैऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी, “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र संतापजनक व चिंताजनक वातावरण दिसले, त्याला पालकमंत्री जबाबदार” असल्याचंही त्यांनी म्हटलं.
दरम्यान, मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षणबाबतही महाविकास आघाडी सरकार काहीच करू शकलं नाही. अधिवेशन काळात आपल्याला काहीतरी करता येतं, मात्र हे अधिवेशन फक्त 2 दिवसासाठी घेण्याचा निर्णय या सरकारनं घेतल्यामुळं हे सरकार राज्यात अपयशी ठरलं आहे, अशी टीकाही शेलारांनी यावेळी केली.
महत्वाच्या घडामोडी –
ठाकरे सरकार कायद्याने चालत नाही हे राष्ट्रपतींना कळवा- देवेंद्र फडणवीस
“उद्धव ठाकरे पाच वर्षाचा कालावधी पुर्ण करतील असं शरद पवार म्हणालेत”
26 जूनच्या आंदोलनात महाविकास आघाडी सरकार जळून जाईल- सुधीर मुनगंटीवार
2024 मध्ये जनता मोदी सरकारला पायउतार केल्याशिवाय राहणार नाही- नाना पटोले