Home जळगाव 2024 मध्ये जनता मोदी सरकारला पायउतार केल्याशिवाय राहणार नाही- नाना पटोले

2024 मध्ये जनता मोदी सरकारला पायउतार केल्याशिवाय राहणार नाही- नाना पटोले

जळगाव : 2024 मध्ये जनता मोदी सरकारला पायउतार केल्याशिवाय राहणार नाही, असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं.

नाना पटोले हे आज जळगाव दौऱ्यावर आहेत. मोदी सरकारने लादलेल्या तीन काळ्या कृषी कायद्याचे दहन नाना पटोले यांच्या उपस्थितीत फैजपूर या ऐतिहासिक भूमीतील धनाजी नाना महाविद्यालयात करण्यात आलं. यावेळी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

सत्ता ही लोकांच्या सुरक्षेसाठी असली पाहिजे, दुराचारासाठी नाही. पण भाजपने ज्या पद्धतीने देशात दुराचार माजवला आहे. त्या विरोधात आज सामान्य जनता तसेच काँग्रेसजन अशा सर्वांच्या मनात आग पेटली आहे. उद्या ही आग बाहेर आली तर भाजपला जमीनदोस्त केल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल नाना पटोलेंनी यावेळी केला.

दरम्यान, पाशवी बहुमताच्या आधारावर मोदी सरकार देशाची आर्थिक व्यवस्था, शेतकरी, बेरोजगार आणि गरिबांना संपवण्याचं काम करत आहे, अशी टीकाही नाना पटोलेंनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

“राजस्थान राॅयल्सला मोठा धक्का! राजस्थानच्या ‘या’ स्टार खेळाडूची IPL च्या उर्वरित सामन्यांतून माघार”

“अहमदनगरमध्ये महापाैरपदाच्या निवडणूकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र”

“महाविकास आघाडीतील ‘आणखी’ एक पक्ष स्वबळावर मैदानात”

“आपणच बॉस असून पवारांना फाट्यावर मारतो, हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिलं”