मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणु शर्मा या तरुणीने पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली. यानंतर विरोधकांकडून वारंवार त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. त्यावरुन राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवर यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
शपथपत्रात मुंडे यांनी माहिती लपवली की नाही हे पाहावं लागेल. त्यातील काही तांत्रिक गोष्टी बघाव्या लागतील. देशात अशा अनेक गोष्टीही झाल्या आहेत. देशातील सर्वोच्च प्रमुखांच्याबाबतीतही अशा गोष्टी झाल्या आहेत. त्याच्या खोलात जाण्याची गरज नाही. सत्ता हातून गेल्याने काहीजण अस्वस्थ झाले आहेत, असा टोला शरद पवार यांनी यावेळी लगावला.
दरम्यान, भाजपाचं काय म्हणणं आहे माहिती नाही. काळजीपूर्वक चौकशी केली पाहिजे असं त्यांच्या मोठ्या नेत्याने म्हटलं आहे. त्यांच्याच पक्षातल्या माजी आमदाराने आपला अनुभव सांगितल्यानंतर भाजपा किंवा अन्य कोणी काय म्हणत असेल तर कदाचित ते टीका करण्याची संधी म्हणून करत असावेत. त्यावर काही बोलायचं नाही. हा त्यांचा अधिकार आहे, असंही शरद पवार म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा आहे ना संत्री- अनिल देशमुख
…तर मग मीच माघार घेते तुमचीही तिच इच्छा आहे- रेणू शर्मा
निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे- अजित पवार
…तर माझा धनंजय मुंडे झाला असता; मनसेच्या ‘या’ नेत्याचा धक्कादायक खुलासा