Home महाराष्ट्र …तर मग मीच माघार घेते तुमचीही तिच इच्छा आहे- रेणू शर्मा

…तर मग मीच माघार घेते तुमचीही तिच इच्छा आहे- रेणू शर्मा

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंच्या विरोधात आरोप करणाऱ्या रेणू शर्मावर भाजपचे नेते कृष्णा हेगडे आणि मनसेचे नेते मनीष धुरी यांनी फसवनुकीचा आरोप केल्यामुळे या प्रकरणाला वेगळच वळण मिळालय. आता तक्रारदार महिलेने आपण माघार घेत असल्याचं ट्विट आहे.

एक काम करा सगळे निर्णय घेऊन टाका. कोणतीही माहिती न घेता तुम्ही सर्व आणि जे मला ओळखत आहेत तेही आरोप करत आहात तर मग तुम्ही सर्व मिळून निर्णय घ्या. मीच माघार घेते तुमचीही तिच इच्छा आहे, असं रेणू शर्माने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, जर मी चुकीची आहे तर हे लोक आतापर्यंत समोर का नाही आले? मी जरी मागे हटले तरी, कोणत्याही पक्षाचं नाव न घेताही मला खाली पाडण्यासाठी आणि आता हटवण्यासाठी इतक्या लोकांना एकत्र यावं लागलं आणि त्यांच्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात मी एकटी मुलगी लढत होती याचा अभिमान आहे. आता तुम्हाला जे लिहायचं आहे ते लिहा,असंही रेणू शर्मा म्हणाली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे- अजित पवार

…तर माझा धनंजय मुंडे झाला असता; मनसेच्या ‘या’ नेत्याचा धक्कादायक खुलासा

“नीलमताई, सुप्रियाताई, यशोमतीताई दिसल्यास सांगा, 500 रुपये रोख जिंका”

शरद पवारांशी चर्चा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची हकालपट्टी करा- अतुल भातखळकर