Home महाराष्ट्र वकीलसाहेब स्वत: डिप्रेशनमध्ये आहेत, म्हणून आम्ही त्यांची हकालपट्टी करत आहोत; एसटी कर्मचारी...

वकीलसाहेब स्वत: डिप्रेशनमध्ये आहेत, म्हणून आम्ही त्यांची हकालपट्टी करत आहोत; एसटी कर्मचारी संघटनेची माहिती

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : न्यायालयात एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडणारे वकिल गुणरत्न सदावर्ते यांना हटविण्याचा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. सदावर्ते यांच्या जागी आता ठाण्याचे वकील सतीश पेंडसे हे न्यायालयीन लढाई लढणार आहेत.सोमवारी झालेल्या बैठकीत एसटी कृती समितीने हा निर्णय घेतला आहे.

“वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यामुळे लोकांच्या डोक्यात भ्रम निर्माण झाला होता. वकीलसाहेब स्वत: डिप्रेशनमध्ये आहेत. आम्ही त्यांची हकालपट्टी करत आहोत, असं राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुनील निरभवणे म्हणाले आहेत.

हे ही वाचा : काँग्रेसचा भाजपाला मोठा धक्का; ‘या’ मोठा नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

ज्यांची नोकरी गेली ती आता वाचणार आहे. एसटी टिकवण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांची आहे. एसटी टिकेल तर आपण टिकू”, असंही सुनील निरभवणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सोमवारी एसटी कामगार कृती समितीची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासमवेत बैठक पार पडली होती. त्यानंतर एसटी कामगार कृती समितीने हा निर्णय घेतला आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

भाजपचे 13 आमदार लवकरच पक्षाला रामराम करणार; शरद पवारांचा मोठा दावा

“राष्ट्रवादीचा काँग्रेसला दणका; ‘य़ा’ मोठ्या नेत्यानं केला राष्ट्रवादीत प्रवेश”

शरद पवारांनी कोणत्या अधिकारांनी एसटी कर्मचाऱ्यांची बैठक घेतली?; भाजपच्या प्रश्नाला शरद पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…