आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : ‘मुंबई, स्वस्थ रहा; सुरक्षित रहा’ या संदेशाचा गुजराती भाषेतला फलक आयसीआयसीआय बँकेने लावल्याने मनसेने बँकेला समज दिली. यानंतर बँकेने हा फलक मराठीत लावून चूक दुरुस्त केली.
मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी याबाबत ट्विट केलं आहे ‘मुंबई, महाराष्ट्राची भाषा ही मराठी आहे गुजराती नाही हे आय.सी.आय.सी.आय़ बॅंकेला मनसेच्या इशाऱ्यानंतर कळले. आय.सी.आय.सी.आय बॅंकेने ‘मराठी भाषा’समाविष्ट करून आपली चुक दुरूस्त केली.
दरम्यान, यापुर्वी देखील मनसेने दादर आणि माहिममधील दुकानांवरील गुजराती भाषेतील पाट्या हटवल्या होत्या. दादरमधील एका ख्यातनाम ज्वेलर्सवर आणि माहिममधील एका हॉटेलवर मनसेने धडक दिली होती.
मुंबई,महाराष्ट्राची भाषा ही मराठी आहे गुजराती नाही हे आय.सी.आय.सी.बॅंकेला #मनसे_इशाऱ्यानंतर कळलं @ICICIBank ने
‘मराठी भाषा’समाविष्ट करून आपली चुक दुरूस्त केली. #आमचीभाषामराठी pic.twitter.com/fj55DWqWuJ— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) September 16, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“…म्हणून उद्धव ठाकरेंनी केला जगनमोहन रेड्डींना फोन”
पिंपरीत राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम; महापालिकेतील ‘या’ बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश
बदामाचा खुराक चालू करा म्हणजे…; रुपाली चाकणकरांचा टोला