महाराष्ट्रात ‘भगव्या’चं राज्य येत आहे…; नितेश राणेंच्या ट्विटने खळबळ

0
296

मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक हे मागील काही महिन्यांपासून केंद्रीय यंत्रणांच्या तपासामुळे चर्चेत आहेत. तपासाच्या या ससेमिऱ्याला कंटाळून सरनाईक यांनी थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं. हे पत्र आज समोर आलं असून, त्यावरून बरीच राजकीय चर्चा सुरू झाली आहे. या पत्रानंतर आता भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी खळबळ उडवून देणारं ट्विट केलं आहे.

भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी सत्तांतराचे संकेत देणारं एक ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे. नितेश राणे यांनी दोनच वाक्यात ट्विट केलं आहे. ज्यात त्यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचं ब्रीद असलेल्या ‘हीच ती वेळ’चाही उल्लेख केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात “भगव्या” च राज्य येते आहे…हीच ती वेळ,  असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

ठाकरे सरकारलाच कोरोनाची लागण, सरकार गेल्याशिवाय हा कोरोना बरा होणार नाही- सदाभाऊ खोत

प्रताप सरनाईक यांचं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं; म्हणाले…

“बाळासाहेब ठाकरेंसाठी वाईट वाटतं, शिवसेनेची सुरूवात केली वाघांना घेऊन…संपणार कुत्र्यांमुळे”

“स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसने आधी गोंधळातून बाहेर यावं आणि मग निर्णय घ्यावा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here