Home महाराष्ट्र राजा रयतेचा असतो, तलवार कुणाविरोधात उपसणार?- विजय वडेट्टीवार

राजा रयतेचा असतो, तलवार कुणाविरोधात उपसणार?- विजय वडेट्टीवार

मुंबई :  गरज पडली तर मराठा आरक्षणासाठी तलवारही काढू, असं वक्तव्य खासदार संभाजीराजेंनी केलं होतं. त्यावरुन मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नाव संभाजीराजेंवर निशाणा साधला आहे.

राजा रयतेचा असतो, समाजाचा नसतो; तलवार कुणाविरोधात उपसणार?, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

शाहू महाराजांनी पुरोगामी विचार मांडले; मग हे राजकारण कशासाठी, एका समाजासाठी भांडताना दुसऱ्या समाजाचे अहित होता कामा नये. ओबीसीविरोधात, दलितविरोधात, तलवारीची भाषा कशासाठी, असं वेडट्टीवार म्हणाले.  .

दरम्यान, 200 जागा आहेत, त्यात 23 जागा ह्या मराठा समाजासाठी आहेत. अडीच लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. वय, जात आणि लग्नाचे अनेक प्रश्न असतात. माझी भूमिका विचारल्यास परीक्षा झाली पाहिजे, पण त्यात मराठा समाजासह कोणत्याही समाजाचे नुकसान झालं नाही पाहिजे, म्हणून राजेंना सांगतोय मध्य मार्ग काढता येतो का बघा, असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

दिल्ली कॅपिटल्सचे राजस्थान राॅयल्सपुढे 185 धावांचे लक्ष्य

 “महाविकास आघाडी सरकारच्या तीन विकेट निश्चित, पहिली विकेट आव्हाडांची पडणार”

नुसतं बोलण्यापेक्षा मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला दिशा द्या, नंतर काय ते राजकारण करत बसा- छत्रपती संभाजीराजे

उदयनराजेंबाबतचं आंबेडकरांचं वक्तव्य पटलं नाही- छत्रपती संभाजीराजे