मुंबई : विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
पूरग्रस्तांना फक्त 3000 रुपयांचा धनादेश देणाऱ्या या सरकारची अवस्था राजा उदार झाला अन् हाती भोपळा आला अशी झाली आहे, असं म्हणत फडणवीसांनी सरकारला टोला लगावला आहे.
दरम्यान, केंद्राच्या कृषी कायद्याचं बारकाईने विवेचन करताना हा कायदा शेतकरी हिताचाच आहे, असं फडणवीस म्हणाले. तसेच राज्यात आधीपासूनच कंत्राटी शेतीचा कायदा अस्तित्वात आहे. त्याविरोधातही तुम्ही आंदोलनं करणार का? असा सवालही फडणवीसांनी यावेळी उपस्थित केला.
महत्वाच्या घडामोडी-
“गणपतीपुळे येथे समुद्रात बुडताना 2 पर्यटकांना वाचवलं”
ऐकमेकांची डोकी फोडायची असतील तर फोडा, पण विज बिलाचा प्रश्न मिटवा- देवेंद्र फडणवीस
चंद्रकांत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा; भाजपच्याच पदाधिकाऱ्यांची मागणी