कोणत्याही निर्णयावर ठाम नसणं हा राष्ट्रवादीचा इतिहास; मनसेचा टोला

0
658

मुंबई : राज्यात सध्या मनसे आणि राष्ट्रवादी यांच्यात सध्या शाब्दिक चकमक सुरू आहे. यातच बोलताना मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी बोलताना राष्ट्रवादीवर हल्लाबोल चढवला आहे.

राष्ट्रवादी हा आपल्या भुमिकेवर ठाम नसणारा पक्ष आहे, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे. तसेच राज्यातील मंदीर उघडली की गर्दी होते. पण यांच्या कार्यकर्ता मेळाव्याला गर्दीने कोरोना होत नाही, अशी दुटप्पी भूमिका राष्ट्रवादी घेत आहे., असं देशपांडे म्हणाले.

दरम्यान, सरकार सतत सांगत आहे गर्दी करू नका. राष्ट्रवादी हा सरकारचा भाग आहे. पण राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष महेबूब शेख हे कार्यक्रम घेत फिरत आहेत. असली दुटप्पी भुमीका राष्ट्रवादी घेतं. म्हणून तर या पक्षावर लोकांचा विश्वास राहिला नाही, असा घणाघात देशपांडे यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

“लावणी सम्राज्ञी सुरेख पुणेकर हाती बांधणार घड्याळ; अजित दादांच्या उपस्थितीत करणार राष्ट्रवादीत प्रवेश”

तालिबानमुळे भारताच्या अडचणी वाढण्याची शक्यता; राजनाथ सिंग यांनी व्यक्त केली चिंता

साकीनाका बलात्कार प्रकरण; पीडितेस न्याय मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध- जयंत पाटील

“उद्धव ठाकरेंनी भरचौकात थोबाडीत मारली तरी आम्ही सत्ता सोडणार नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here