Home देश तालिबानमुळे भारताच्या अडचणी वाढण्याची शक्यता; राजनाथ सिंग यांनी व्यक्त केली चिंता

तालिबानमुळे भारताच्या अडचणी वाढण्याची शक्यता; राजनाथ सिंग यांनी व्यक्त केली चिंता

नवी दिल्ली : तालिबानने अफगाणिस्तानमध्ये नवीन सरकार स्थापन करणाऱ्याची घोषणा केली. याच पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी ऑस्ट्रेलियाचे सरंक्षणमंत्री पीटर डटन यांच्याशी तालिबान दहशतीविषयी बोलताना भारताविषयी चिंता व्यक्त केली आहे.

तालिबानने अफगाणिस्तानावर कब्जा मिळवल्यानंतर परिस्थिती गंभीर आहे. याचे पडसाद भारतावरही उमटण्याची शक्यता आहे. आता तालिबानचा उदय हा भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत चिंतेचा विषय बनला आहे, असं राजनाथ सिंग  म्हणाले आहेत.

“तालिबान सध्या जगासमोर आपली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करत आहे. अफगाणिस्तानमधील जमिनीचा वापर कोणत्याही देशावर हल्ला करण्यासाठी किंवा धमकावण्यासाठी होऊ शकतो. त्यामुळे अफगाणिस्तानवर युएन सेक्योरिटी काऊंसिल रिझॉल्युशन 2593 लागू करण्यात यावे, असंही राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

साकीनाका बलात्कार प्रकरण; पीडितेस न्याय मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध- जयंत पाटील

“उद्धव ठाकरेंनी भरचौकात थोबाडीत मारली तरी आम्ही सत्ता सोडणार नाही”

शिवसेनेसोबत राहिल्यास काँग्रेसला नक्कीच अच्छे दिन येणार; अब्दुल सत्तार यांचा सल्ला

“जतमध्ये काँग्रेसला खिंडार, अनेक मोठ्या नेत्यांचा जयंत पाटलांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश”