जेवढ्या उंचीची आहे मी, तेवढीच लायकी ठेवा; पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर भडकल्या

0
624

परळी : भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांची जनआशिर्वाद यात्रा आजपासून सुरु होत आहे. ही यात्रा बीडच्या परळी येथील गोपीनाथ गडावरुन निघणार आहे. मात्र त्याआधीच परळीत राडा पहायला मिळाला.

आज सकाळी 9.30 च्या सुमारास भागवत कराड हे पंकजा मुंडे यांच्या घरी पोहोचले. पंकजा मुंडे यांनी भागवत कराड यांचं स्वागत केलं. परंतु पंकजा मुंडे यांच्या घरासमोर कार्यकत्यांनी गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. कराड यांच्यासमोर राडा करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पंकजा संतापल्या.

अंगार भंगार घोषणा काय देताय…. तुमच्यावर असे संस्कार आहे का? दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम सुरु आहे का?… असं वागणं मला चालणार नाही… असंच जर वर्तन असेल तर परत मला भेटायला येऊ नका… जेवढ्या उंचीची आहे मी तेवढी लायकी ठेवा, नाहीतर येऊ नका परत माझ्याकडे, असं म्हणत पंकजा मुंडे गाडीच्या दिशेने निघून गेल्या.

महत्वाच्या घडामोडी –

पत्नीला किस करायला गेला आणि…; नवरदेवाच्या उडालेल्या फजितीचा व्हिडिओ व्हायरल

“डाॅ.भागवत कराड पंकजा मुंडेंच्या घरी दाखल, कार्यकर्त्यांची पंकजा-प्रीतमच्या नावाने जोरदार घोषणाबाजी”

आमच्या नादी लागू नका, पालकमंत्र्यांच्या नादी लागला तर शहरातही दिसणार नाही- गुलाबराव पाटील

बैलगाड्या शर्यतीबाबत कायद्याच्या चाकोरीत बसून निर्णय घ्यावा लागेल- जयंत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here