आमदारांच्या बंडामागे खरंच मुख्यमंत्र्यांचा हात?; स्वत: उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

0
381

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या काही आमदारांसोबत बंडखोरी केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शिवसेना नगरसेवकांशी दृक्श्राव्य माध्यमातून संवाद साधला.

सध्या दाखवलं असं जात आहे की, शिवसेना राहिलीच नाही. मात्र, मी तुमच्या साथीने सभा घेणार आहे, शिवसेना मर्दांची सेना आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हे ही  वाचा : “आम्ही शिवसेना सोडून कुठेही जाणार नाही; शिंदे गटातील ‘या’ महिला आमदाराचा व्हिडिओ व्हायरल”

दरम्यान, शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना मी म्हटलं होतं, दगा देणारे मला नकोत. काँग्रेस राष्ट्रवादी पाठीत खंजीर खुपसतील असं सगळे म्हणत होते, पण आज पवारसाहेब आणि सोनियाजी पाठीशी आहेत, मात्र जवळचे सोडून गेलेत. इथे उपस्थितांची पात्रता असताना त्या लोकांना आपण जागा दिली, निवडून आणलं, पण ते गेले आणि तुम्ही कायम सोबत आहात.

महत्त्वाच्या  घडामोडी – 

“शरद पवार गोड बोलून काटा काढतात”;शिंदे गटात सामील असणाऱ्या ‘या’ आमदाराचं वक्तव्य

“बंडखोर आमदारांना परत आणण्यासाठी शरद पवार मैदानात, मुख्यमंत्र्यांसोबत दोन तास चर्चा, तर्कवितर्कांना उधाण”

मी आजही शिवसैनिक, कायम उद्धवजींसोबत; शिंदे गटात सामील असणाऱ्या ‘या’ आमदाराचं ट्विट 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here