Home महाराष्ट्र सरकारला लाथा घातल्याशिवाय जाग येत नाही; EWS आरक्षणावरून विनायक मेटेंचा घणाघात

सरकारला लाथा घातल्याशिवाय जाग येत नाही; EWS आरक्षणावरून विनायक मेटेंचा घणाघात

मुंबई : राज्यातील मराठा विद्यार्थी आणि नोकरीसाठी पात्र उमेदवारांना 10 टक्के ईडब्ल्यूएस प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. यावर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

शिवसंग्रामने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि उच्च न्यायालयाने दणका दिला तेंव्हा राज्य सरकारने EWS आरक्षणाचा आदेश काढला. त्यामुळे सरकारला लाथा घातल्याशिवाय जाग येत नाही, असा हल्लाबोल विनायक मेटेंनी यावेळी केला.

दरम्यान, आता उशिरा का होईना पण राज्य सरकारने आदेश काढला, त्यांचे आभार. मात्र, याबरोबरच मराठा समाजाच्या इतर प्रश्ना संदर्भातही राज्य सरकारनं तातडीनं निर्णय घ्यावेत. अन्यथा मराठा समाजाच्या रोषाला तयार व्हा, असा इशारा विनायक मेटेंनी यावेळी दिला.

महत्वाच्या घडामोडी –

मराठा आरक्षणाच्या जबाबदारीतून पळ काढू नका; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला टोला

‘या’ कारणामुळं भाजप आमदार महेश लांडगे यांच्यासह 60 जणांविरोधात गुन्हा दाखल

सरकार माझ्यावर पाळत ठेवतंय; संभाजीराजे यांचा खळबळजनक आरोप!

सरकारची OBC आरक्षणाची मानसिकता नाहीच, आम्ही निवडणुका होऊ देणार नाही- पंकजा मुंडे