मुंबई : तुमच्यात मतभेद आहेत हे आम्ही बोलायचं नाही का? असा सवाल करत चौथीची पोरगी पण सांगेल की ठाकरे सरकारचं काही खरं नाही, अशी बोचरी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर केली आहे. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.
मुंबईत एवढे मूर्खपणाचे निर्णय घेत आहेत की काही बोलायलाच नको. आजार राहिला बाजूला पण सामान्य माणूस मात्र वैतागला आहे. आम्ही काही बोललो की जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील लगेच बोलतात सत्तेची हाव लागलीय. तुमच्यात मतभेद आहेत हे आम्ही बोलायच नाही का? चौथीची पोरगी पण सांगेल की यांचं काही खरं नाही”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री किंवा सत्ताधाऱ्यांचा लोकांशी काहीच संबंध नाही. आम्ही सत्तेत असताना विरोधकांना तेव्हाही विचारात घेत होतो. एकट्या देवेंद्र फडणवीसांना जरी दिवसाचे दोन तास मागितले असते, तर त्यांनी कितीतरी प्रश्न सोडवले असते. पण ही मदत घ्यायला इगो आडवा येतोय”, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
“जातो माघारी पंढरीनाथा; तुझे दर्शन झाले आता”
तिथं मॅप बदललेत, आपण अॅपवर बंदी घालतोय; जितेंद्र आव्हाडांचा केंद्र सरकारवर निशाणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ‘ही’ मागणी पंतप्रधानांनी केली मान्य