आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
औरंगाबाद : 1 मे महाराष्ट्र दिना रोजी औरंगाबाद येथे केलेल्या भाषणासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यावरून आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“सुरुवातीपासूनच ज्या पद्दतीने सभेला परवानगी न देणं, जाचक अटी टाकणं सुरु होतं त्यावरुन राज्य सरकारचा राज ठाकरेंना अडकवण्याचा प्रयत्न असल्याचं दिसत होतं., असा आरोप संदीप देशपांडेंनी यावेळी सरकारवर केला. ते एबीपी माझाशी बोलत होते.
हे ही वाचा : “मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल”
सभेला इतकेच लोक असले पाहिजेत अशी अट याआधी टाकली होती का? राज्य सरकारचा पोलिसांवर दबाव असल्याने गुन्हा दाखल झाला आहे. यामधील एकही कलम हे कायद्याच्या कसोटीवर टिकणारं नाही, असंही देशपांडेंनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“गुजरातमध्ये भाजपचा काँग्रेसला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती घेतलं कमळ”
देवेंद्र फडणवीस मिस्टर इंडिया बनून, बाबरीच्या ढांच्यावर…; शिवसेनेचा जोरदार हल्लाबोल