Home महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांनी एकही शब्द न बोलणं म्हणजे या हल्ल्याचे समर्थन; नवनीत राणा यांची...

मुख्यमंत्र्यांनी एकही शब्द न बोलणं म्हणजे या हल्ल्याचे समर्थन; नवनीत राणा यांची उद्धव ठाकरेंवर टीका

मुंबई : मुंबईतील कांदिवलीमध्ये शिवसैनिकांनी एका नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. यावर आता खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्यावर हल्ला झाला होता. उद्धव ठाकरे यांनी जनतेशी लाईव्ह संवाद साधताना एकही शब्द न बोलणं म्हणजे त्या हल्ल्याचं समर्थन आहे, अशी टीका नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

संवेदनाहीन मुख्यमंत्री याबाबत दिलगिरी सुद्धा व्यक्त करत नाहीत. हा संपूर्ण देशातील माजी सैनिकांचा अपमान आहे. याप्रकरणी लोकसभेत आवाज उठवणार आहे. याबाबत न्याय मिळवून देऊ, असंही नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, देशातील कुठल्याही माजी सैनिकांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. गुंडप्रवृत्तीच्या हल्लेखोर शिवसैनिकांना कठोर शिक्षा होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असं देखील नवनीत राणा यांनी यावेळी म्हणत शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी- 

हे वक्तव्य त्यांनी पुन्हा एकदा मातोश्रीमध्ये लपून राहण्यासाठी केलं; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

“मुंबई असो कि महाराष्ट्र एकच ब्रँड छत्रपती शिवाजी महाराज”

ठाकरे ब्रॅण्डचा जोर हवा, राज ठाकरेंनाही भविष्यात फटका बसेल- संजय राऊत

मराठा आरक्षणावर कोर्टात कमी पडलो नाही, राज्य सरकार मराठा समाजासोबतच- मुख्यमंत्री उद्धव ठाकरें