Home महाराष्ट्र संपूर्ण राज्य आता तिसऱ्या स्तरात, तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध सर्व जिल्ह्यात लागू; नवी...

संपूर्ण राज्य आता तिसऱ्या स्तरात, तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध सर्व जिल्ह्यात लागू; नवी नियमावली जारी

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हळूहळू होत असलेली कोरोना रुग्णसंख्येतील वाढ आणि डेल्टा प्लसचे आढळून आलेले रुग्ण यामुळे राज्य सरकारनं नव्यानं नियमावली जारी केली आहे.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यासाठी पाच टप्पे जाहीर करण्यात आले होते. मात्र, राज्य सरकारच्या नव्या आदेशानं सर्व जिल्ह्यांना तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करावे लागणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना याशिवाय वेळोवेळी शासनाकडून देण्यात आलेले आदेश आणि कोरोना रुग्णांची संख्या पाहून निर्णय घेण्यास सांगण्यात आलं आहे.

अशी असेल नवी नियमावली – 

1. लोकजागृतीच्या उपक्रमांद्वारे लसीकरणाचा वेग वाढवणे, पात्र लोकांपैकी किमान 70 टक्के लोकांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावे.

2. कोव्हिडचा प्रसार रोखण्यासाठी टेस्ट-ट्रॅक-ट्रीट या पद्धतीचा जास्तीत जास्त अवलंब करावा.

3. कोव्हिडच्या विषाणूचा हवेतून प्रसाराचा गुणधर्म लक्षात घेता हेपा फिल्टर्स किंवा एक्झॉस्ट फॅनचा वापर करून वातानुकूलनाच्या उचित नियमांचे पालन करीत कामकाजाच्या ठिकाणांची व कार्यालयांची सुरक्षितता निश्चित करणे संबंधितांना बंधनकारक करावे.

4. सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे अपेक्षित चाचण्या आणि आरटी-पीसीआर चाचण्या तसेच इतर चाचण्या मोठ्या प्रमाणावर कराव्यात.

5. कोव्हिडरोधक वर्तणूक न करणाऱ्यांवर प्रभावीपणे दंडात्मक कारवाई करावी.

6. गर्दी, जमाव आणि मेळाव्यांना प्रोत्साहन मिळेल असे सोहळे/कार्यक्रम/उपक्रम टाळावेत.

7. न्याय्य पद्धतीने कन्टेनमेन्ट क्षेत्रे घोषित करावीत जेणेकरून छोट्या क्षेत्रावर, विशेष करून बाधित क्षेत्रावरच बंधने लागू होतील.

8. विशेष करून विवाह सोहळे आणि उपाहारगृहे, मॉल यांसारख्या गर्दीची अधिक शक्यता असलेल्या ठिकाणांची तपासणी करून CAB च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी फिरती पथके नियुक्त करावीत. CAB चे नियम हे बंधने कमी करण्यासाठी अत्यावश्यक आहेत. हे सामाजिक पातळीवर पाळायचे नियम आहेत.

दरम्यान, सदर नियमांचे पालन न केल्यास नागरीकांना दंड होईल. सदर आदेश मा. राज्यपालांच्या वतीने राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जारी केले आहेत असे परिपत्रक महसूल, वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडून 25 जून रोजी प्रसिध्दीस देण्यात आले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

करावं तसं भरावं, त्यामुळे ईडीच्या कारवाईवर राष्ट्रवादीने राजकारण करू नये- नारायण राणे

“गुलाबराव पाटील मला वडिलांसारखे, मुलीनं चांगलं काम केलं म्हणून प्रोत्साहन द्यायला हवं”

“अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; नागपूरमधील निवासस्थानी ED चा छापा”

घाईघाईने निर्बंध शिथिल करु नका; मुख्यमंत्र्यांच्या सूचना; ‘या’ 7 जिल्ह्यांना अधिक काळजी घेण्याचं आवाहन