Home जळगाव “गुलाबराव पाटील मला वडिलांसारखे, मुलीनं चांगलं काम केलं म्हणून प्रोत्साहन द्यायला हवं”

“गुलाबराव पाटील मला वडिलांसारखे, मुलीनं चांगलं काम केलं म्हणून प्रोत्साहन द्यायला हवं”

जळगाव : केळी पीक विम्याचे निकष बदलल्यानं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणं आता सोपं झालं आहे. यावरून भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. यावर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता.

हवामानावर आधारित फळपीक विम्याचे निकष राज्य शासनाने बदलले आहेत. पण भाजप खासदार रक्षा खडसे या केंद्राने निकष बदलल्याचा खोटा दावा करत आहेत. कुठे लग्न दिसले की आपला वाजा घेऊन त्या ठिकाणी वाजवण्यास त्या हजर होतात, असा टोला गुलाबराव पाटलांनी रक्षा खडसेंना लगावला होता. यावर रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया दिली.

केळी पीक योजनेच्या नुकसान भरपाईचे निकष बदल करण्याचे श्रेय मी घेत नाही. मात्र मंत्री गुलाबराव पाटील हे मला वडिलांसारखे आहेत. त्यामुळे याप्रकरणी त्यांनी माझ्यावर टीका न करता मुलीने चांगलं काम केलं म्हणून प्रोत्साहन द्यायला हवं, असं रक्षा खडसे म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी –

“अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; नागपूरमधील निवासस्थानी ED चा छापा”

घाईघाईने निर्बंध शिथिल करु नका; मुख्यमंत्र्यांच्या सूचना; ‘या’ 7 जिल्ह्यांना अधिक काळजी घेण्याचं आवाहन

” ही महाविकास आघाडी नव्हे, ही तर ‘महाविनाश’ आघाडी”

तुमच्यात हिंमत नसेल तर आम्हांला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो- देवेंद्र फडणवीस