Home महाराष्ट्र लोकशाही पद्धत आता भाजपात राहिलेली नाही- एकनाथ खडसे

लोकशाही पद्धत आता भाजपात राहिलेली नाही- एकनाथ खडसे

मुंबई : विधानसभा निवडणुकीत डावलल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं भाजपा पक्षश्रेष्ठींना सांगितलं होतं. तसं  त्यांना आश्वासनही देण्यात आलं होतं. पण, भाजपानं घोषित केलेल्या उमेदवारांमध्ये अनपेक्षित नावं जाहीर झाल्यानं एकनाथ खडसे राज्यातील भाजपा नेत्यांवर चांगलेच संतापले आहेत.

पक्षाचा विस्तार होईल, यापेक्षा एखाद्या व्यक्तीचा, व्यक्तिमत्वाचा विकास होईल, अशा स्वरूपाचं वातावरण आज भाजपमध्ये आहे. एखाद्या कुठल्यातरी व्यक्तीची हुकुमशाही चालवून घ्यायची आणि त्यांनीच निर्णय घ्यायचे. वरिष्ठांचे आशीर्वाद असल्यामुळे स्वतः सर्वस्वी समजायचं, हे जे भाजपात सुरू आहे. लोकशाही पद्धत आता भाजपात राहिलेली नाही, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केलं आहे.

स्वतःकडे ज्यावेळस अधिकार येतात तेव्हा संघटनेला विश्वासात न घेता, मी पक्ष चालवतो, अशी भावना निर्माण होते. तेव्हा पक्षाची अशी वाताहत होते. आज भाजपाचं जे चित्र आहे, ते सामूहिक नाही. संघटित नाही. एकमेकांशी चर्चा करून निर्णय घेतले जात नाही.  एखाद्यावेळी तर ते देखाव्यापुरते दाखवले जातात. असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

आपल्याला नियमांचं पालन करुन या युद्धाचा सामना करायचा आहे- नरेंद्र मोदी

भाजपाने ऐनवेळी बदलला विधानपरिषद उमेदवार; पंकजा मुंडेंच्या ‘या’ कट्टर समर्थकला उमेदवारी

तुमचा भाऊ म्हणून मी सदैव तुमच्यासोबत; जयंत पाटलांचं परिचारिकांना भावनिक पत्र

करोनामुक्ती लढ्यातील परिचारिकांच्या सेवेची मानवतेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल- अजित पवार